लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर :
नागपूर परिक्षेत्राचे  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्याचे  अधीक्षक (उपायुक्त) पी. आर. पाटील यांच्याविरुद्ध लैंगिक छळ केल्याच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. एसीबीत कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर मंगळवारी येथील सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पातळीवर त्याची माहितीवजा चर्चा सुरू झाल्याने राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
 गेल्या दीड वर्षांपासून पी. आर. पाटील हे  नागपुरात कार्यरत आहेत. त्यांच्या अधिकारक्षेत्रात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील एसीबीची कार्यालये येतात.  विनयभंगाची तक्रार करणारी महिला येथील एसीबीच्या कार्यालयात कर्तव्यावर आहे. तिच्या तक्रारीनुसार, वेगवेगळ्या कारणाने पाटील यांनी तिच्याशी सलगी साधण्याचे प्रयत्न केले. तिने प्रतिसाद दिला नाही म्हणून पाटील यांनी तिचा छळ चालवला. त्यामुळे तिने त्यांची तक्रार एसीबीच्या वरिष्ठांकडे केली. एका अधीक्षकावर महिला कर्मचाऱ्याकडून गंभीर आरोप लावला जात असल्याने एसीबीच्या महासंचालकांकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यात तथ्य आढळल्याने मुंबईहून एसीबीच्या एसीपी दर्जाची महिला अधिकारी मंगळवारी नागपुरात पोहचली. त्यांनी येथील वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर तक्रारदार महिला कर्मचाऱ्यासह सदर पोलीस ठाणे गाठले. सदरमधील अधिकाऱ्याच्या कक्षात महिला कर्मचाऱ्याची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. दरम्यान, एका पोलीस अधीक्षकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.    Print


News - Nagpur | Posted : 2018-12-05


Related Photos