महत्वाच्या बातम्या

 हिंगणघाट येथील रोजगार मेळाव्यात २ हजार ७३६ पदांसाठी मुलाखती


-  पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

-  ३८४ प्राथमिक तर ३५० उमेदवारांची अंतिम निवड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व बिडकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हिंगणघाट येथे आयोजित पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध नामवंत कंपन्यांच्यावतीने त्यांच्याकडील रिक्त तब्बल २ हजार ७३६ पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतले. या मेळाव्याचे उद्घाटन आ. समिर कुणावार यांच्या हस्ते झाले.

उद्घाटन प्रसंगी आ. कुणावार यांच्यासह उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, कौशल्य विकास विभागाचे नागपूर येथील उपायुक्त प्रकाश देशमाने, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त निता औघड ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषाकिरण थुटे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुजय राहाटे, बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एम. राजुरकर आदी उपस्थित होते.

तरुणांना स्थानिक स्तरावरच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आ. समिर कुणावार यांच्या पुढाकाराने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तरुणांना अशा मेळाव्यातून रेाजगार उपलब्ध होते, असे यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आ. कुणावार यांनी सांगितले. या मेळाव्यात गिमाटेक्स हिंगणघाट, पी.व्ही. टेक्सटाईल्स जाम, वैभव एंटरप्रायजेस नागपूर, प्यजिओ व्हेईकल पुणे, उत्‍कर्ष स्मॉल फायनान्स नागपूर, शेषराव वानखेडे सुतगिरणी नागपूर, धूत ट्रान्समिशन पुणे या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींनी त्यांच्या कंपनीमधील रिक्त असलेल्या २ हजार ७३६ पदांकरीता उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यापैकी ७८४ उमेदवारांची प्राथमिक तर ३५० उमेदवारांची अंतिम निवड केली.

या मेळाव्यात विविध शासकीय विभाग, महामंडळांचे स्वयंरोजगार व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी देखील स्टॉल लावले होते. विविध योजनांची माहिती या स्टॉलवरुन देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण बोडे यांनी केले तर आभार रुपेश रामगडे यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी धिरज मनोहर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे सागर आंबेकर तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट व समुद्रपूर येथील कर्मचारी व बिडकर महाविद्यालयाच्या प्राद्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले, असल्याचे कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्तांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos