महत्वाच्या बातम्या

 जेसीआई चंद्रपूर गरिमा तर्फे प्रयास दिवस निमित्त एफईएस कॉलेजला सॅनिटरी व्हेंडिंग मशीन भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : महिला आरोग्य व सामाजिक विकासासाठी आपली बांधिलकी जपत जेसीआई चंद्रपूर गरिमा (JCI Chandrapur Garima) तर्फे प्रयास दिवस निमित्त एक उल्लेखनीय सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या वतीने गिरनार चौक (अंचलेश्वर गेटजवळ) येथील एफईएस कॉलेजमध्ये सॅनिटरी व्हेंडिंग मशीन भेट देण्यात आली तसेच विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आले.

हा कार्यक्रम २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महाविद्यालयातील विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांमध्ये मासिक पाळी स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे आणि त्यांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा होता.

संस्थेच्या सदस्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हा सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमास माजी अध्यक्षा जेसी गौरी, सदस्य जेसी नरसू आणि जेसी तनिषा यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या योगदानाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

या प्रकल्पाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना संस्थेच्या नेतृत्व टीममधील अध्यक्षा एचजीएफ पूजा मुंधडा, निवर्तमान अध्यक्षा (IPP) जेएफएम स्वाती पुगलिया आणि सचिव एचजीएफ सोनिका बजाज यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. भविष्यातही जेसीआई चंद्रपूर गरिमा अशा सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रमांसाठी सदैव तत्पर राहील, असे त्यांनी सांगितले.





  Print






News - Chandrapur




Related Photos