महत्वाच्या बातम्या

 वन्यप्राणी हल्ल्यात गंभिर जखमी असल्याचे दाखवून बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन शासनाची दिशाभूल !


- जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या तत्कालीन सीएस डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर बडतर्फीची कारवाई करा

- असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांची मुख्यमंख्यांकडे मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हयात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात  किरकोळ जखमी  असलेल्या रूग्णांना  गंभिर जखंमी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन  शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या तत्कालीन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी नियबाहयरित्या आर्थिक हेतूपोटी रूग्णांकडून पैसे घेऊन वैद्यकीय प्रमाणपत्र दिले असून शासनाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांना शासकीय सेवेतून कायमस्वरूपी बडमपर्फ करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र  प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी केली आहे.

पेंदोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र पफडणविस यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की,  गडचिरोली जिल्हयात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात काहींना गंभिर दुखापत, तर काहींना किरकोळ दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जखमी  रूग्णांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात  उपचारासाठी भरती केले जाते. गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात शेजारी चंद्रपूर जिल्हयातील जखमी रूग्ण भरती केल्या जातात.  जखमी रूग्णांवर  योग्य तो उपचार केला जातो.  परंतू  वनविभाग अंतर्गत  वन्यप्राणी हल्ल्यांमध्ये  किरकोळ  जखमी, गंभिर जखमी, कामय अपंगत्व असे  प्रकार असलेल्या रूग्णांवर उपचार केाणत्या बाबीवर करण्यात आले.  याचे प्रमाणपत्र   जिल्हा शल्यचिकीत्सक कार्यालयाकडून  रूग्णाला दिले जाते. त्या वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार  वनविभागाकडून  वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमींना आर्थिक नुकसानभरपाई दिली जाते.

गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात  चामोर्शी, गडचिरोली, आरमोरी आणि चंद्रपूर जिल्हयातील  सावली तालुक्यातील  वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी  रूग्ण उपचारासाठी  भरती करण्यात आले.  वनविभागाकडून  घटनेचे पंचनामे करून रूग्णांना भरती करण्यात आले. चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा वनपरिक्षेत्रातील  चामोर्शी परिसरातील  रेखा किरण मंडोगडे, शारदा  मंगेश सोनटक्के, आशिष मंगेश सोनटक्के,  उत्तम गोविंद मंडल आणि गडचिरोली  तालुक्यातील  चुरमुरा येथील कांताबाई वासुदेव डोंगरे, सावली तालुक्यातील  दाबगाव येथील  दादाजी काशिनाथ भोयर आणि इतर  इसमांवर वन्यप्राण्यांनी हल्ला करून  जखमी केले. मात्र जखम किरकोळ स्वरूपाची होती.

मात्र  गडचिरोलीच्या तत्कालीन निलंबीत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी  आपल्या आर्थिक स्वार्थापोटी  कोणत्याही तज्ञ वैैद्यकीय अधिकारयाचा  सल्ला न घेता  वैद्यकीय अधिकार्यांच्या खोटया स्वाक्ष़्ारी करून  आणि कोणताही अभिप्राय न घेता  किरकोळ जखमी रूग्णांना  गंभिर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले.  डॉ. वर्षा लहाडे यांनी पैसे घेउुन खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र  वाटप केले. त्यांनी रूग्णांची फसवणुक आणि  शासनाची दिशाभूल केली असून त्यांच्यावर तातडीने बडतपर्फीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी केली आहे.

गंभिर रूग्णाचे प्रमाणपत्रासाठी रूग्णालयाचे हेलपाटे -
 उत्तम मंडल हे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गंभिर जखमी झाले होते. तरीही त्यांच्याकडून पैसे  घेऊन चुकीचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात आले. मागील दोन महिन्यापासून  त्यांना जिल्हा रूग्णालयात प्रमापत्रासाठी  हेलपाटे मारावे लागत आहेत. कोणताही अधिकारी त्यांचे ऐकूण घ्यायला तयार नाही.  उत्तम मंडल यांनी  आपल्या पत्नीचे दागिणे विकून  डॉ. वर्षा लहाडे यांना  पंचेचाळीस हजार रूपये दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच इतर नागरिकांनी सुध्दा  गंभिर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्रमिळविण्यासाठी  डॉ. वर्षा लहाडे व कनिष्ठ लिपीक वंदना लाडे यांच्याकडे  प्रत्येकी ७० हजार रूपये दिले आहेत, असा आरोप उत्तम मंडल यांनी केला आहे. तेलही गेले . तूपही गेले, आणि हाती धुपाटणे आले.

ज्या रूग्णांनी गंभिर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र  मिळविण्यासठी ७० हजार रूपये त्यांना मागील चार पाच महिन्यापासून शासनाकडून नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे सदर रूग्णांनी  डॉ. वर्षा लहाडे आणि लिपीक वंदना लाडे यांच्याकडे पैसे परत मिळण्यासाठी संपर्क करीत आहेत. परंतू  त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. वनविभागाकडून पाच लाख रूपये मिळविण्यासाठी खोटे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी ७० हजार रूपये दिले. परंतू आता शासनाकडून नुकसानभरपाई तर सोडा प्रमाणपत्रासाठी  डॉ. वर्षा लहाडे यांना दिलेले पैसे सुध्दा परत मिळत नसल्याने रूणांची मोठी फटफजीत झाली आहे. तेलही गेले आणि तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले अशी स्थिती रूग्णांची झाली आहे.





  Print






Related Photos