अमरावती येथून १४० पिस्तूल आणि ४० जिवंत काडतूसं जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अमरावती :
अमरावती येथून ठाणे, मुंबईला पाठवण्यात येणारा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ठाणे गुन्हे शाखा युनिट १  ने ही कारवाई केली आहे.  दोघा आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे १४० पिस्तूल आणि ४० जिवंत काडतूसं सापडली आहेत. शोएब इसाक शेख आणि रहीम शेख अशी या आरोपींची नावे आहेत.शस्त्रांसहित पोलिसांनी आरोपींकडून तीन लाख रोकड आणि १० मोबाइल जप्त केले आहेत. 
ठाणे पोलिसांना शोएब इसाक शेख आणि रहीम शेख अमरावती येथील शीतल हॉटेलमध्ये श्स्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली. १० ते ७० हजारांपर्यंत या बेकायदेशीर शस्त्रांची विक्री केली जात होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-12-31


Related Photos