महत्वाच्या बातम्या

 मुरखला गावाजवळ एसटी बस अपघात, अनेक प्रवासी जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोलीहून उमरखेडकडे जात असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस आज सकाळी मुरखला गावाजवळ रस्त्याबाहेर जाऊन अपघातग्रस्त झाली. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरु केले.

प्रत्यक्षदर्शकांच्या मते, बस अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उतरली. अपघाताच्या वेळी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते. अपघातानंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण पसरले. जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, काही प्रवाशांना सौम्य जखमा झाल्या आहेत, तर काही गंभीर जखमी आहेत. अद्याप अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि परिवहन विभागाने याची चौकशी सुरु केली आहे.

या अपघातामुळे काही वेळेस मार्गावर वाहतूक देखील प्रभावित झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्परतेने हस्तक्षेप करून प्रवाशांना मदत केली आणि जखमींना बसमधून बाहेर काढले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos