महत्वाच्या बातम्या

 मावा नार, मावा शाळा उपक्रम शिक्षण प्रेरिका प्रशिक्षण भामरागड येथे संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आज ०६ में २०२६ रोज बुधवारला पं. स. भामरागड येथिल सभागृहात शिक्षण विभाग, जि. प. गडचिरोली, उमेद, प्रथम प्रज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मावा नार, मावा शाळा या उपक्रमांतर्गत ३ दिवशीय शिक्षण प्रेरिका प्रशिक्षण उद्घाटन सोहळा संपन्न झाला. हे प्रशिक्षण पुढे तीन दिवस चालणार आहे.

माझे गाव, माझी शाळा, या उपक्रमांतर्गत उमेदचे गाव पातळीवरील प्रवर्तक व गावातील माजी महिला विद्यार्थी १०० दिवस वर्ग १ ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना मराठीतील वाचन लेखन व गणितातील संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया या घटकांवर दररोज दोन तास मार्गदर्शन करणार आहेत. गडचिरोली जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे साहेब यांचेमार्गदर्शनाखाली हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविल्या जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गंगाधर डोर्लिकर, उद्‌घाटक म्हणुन वाढई साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी पं. स. भामरागड, प्रमुख अतिथी म्हणुन मा. चंदु रामटेके, प्रभारी गटशिक्षणाधिकारी,  रामगिरवार, उमेद, अनिरुद्ध केंद्रे, केंद्रप्रमुख मन्नेराजाराम, है उपस्थिती होते. प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रथम फाऊंडेशनचे साईनाथ सलाम, राज्यसमन्वय प्रकाश उसेंडी, शिक्षा मित्र प्रथम फाउंडेशन यांनी भेट दिली, प्रशिक्षण वर्गासाठी  रामजी नरोटे, उज्वला बोगामी, विनीत पद्‌मावार, संदीप जोरगलवार, रामेश्वर जाधव यांनी सुलभक म्हणुन कार्य पार पाडले.

प्रशिक्षण यशस्वीतेसाठी धनिराम तुलावी, गटसमन्वयक व दिनेश गायधने विशेष शिक्षक गट साधन केंद्र, भामरागड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रशिक्षणात भामरागड पं. स. अंतर्गत बहुसंख्य शिक्षण प्रेरिका महिला व शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos