महत्वाच्या बातम्या

 माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जि. अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी राम मंदिर येथे विधिवत पूजा अर्चना करून घेतले दर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील आलापल्ली राम मंदिर येथे काल आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी यांनी भगवान श्रीराम मंदिर येते विधिवत पूजा अर्चना करून दर्शन घेतले.त्यावेळी श्रीराम जन्मोत्सव समिती आलापल्ली तर्फे माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांची स्वागत करण्यात आली.

प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील भव्य नवनिर्माण मंदिरात श्रीरामाचे प्राणप्रतिष्ठा महोत्सव निमित्य गडचिरोली जिल्हासह देश भरात गली- गलीत भक्तीमय वातावरण न्हाऊन निघाला आहे. त्यावेळी माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्यातील चांगला पाऊस पडूदे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे, यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळदे अशी प्रभू श्रीराम कडे प्रार्थना केले. सभापती अजय कंकडालवार यांनी दर्शन घेतले नंतर येथील भाविकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतले आहे.

यावेळी नागेपल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सरोज किशोर दुर्गे, श्रीराम- हनुमान मंदीर कमिटीचे आलापल्लीचे अध्यक्ष मोहन मदने, अरविंद पाध्ये, भैयाजि पुद्दतवार, महावीर अग्रवाल, गणेश गुप्ता, नर्साया रापर्ती, गजानन गादेवार, नारायण काशेट्टीवार, अमित येणफ्रेड्डीवार, जयप्रकाश शेंडे, राजेंद्र सिंग सलुजा, संतोष अग्रवाल, टायगर ग्रुपचे साई तुलसिगिरी, दोलत रामटेके, किशोर दुर्गे, चिंट्टू आत्राम, स्वप्नील मडावी, नरेश गर्गम, प्रमोद गोडसेलवारसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  Print


News - Gadchiroli
Related Photos