ट्रकच्या धडकेत आजोबासह नातू ठार, तीन गंभीर जखमी


- मारेगाव नजीक घटना, घटनास्थळावरून चालक पसार
- सिमेंट ट्रकने दोंघांना चिरडले 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मारेगाव :
मारेगाव वरून दोन दुचाकीवर पाच जण गावाकडे जात असतांना समोरून सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने दोन दुचाकींना जबर धडक दिल्याने दोघेजण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज १६ ऑगस्ट रोजी राज्यमहामार्गावर गुणवंत महाराज देवस्थान समोर ४.३० वाजताच्या  दरम्यान घडली. 
माणिक संभा सुरपाम (८५) रा. खंडणी व प्रफुल भीमराव सुरपाम (२०) रा.मारेगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या आजोबा नातवाचे नाव आहे. दोन मोटार सायकलने मृतक दोघांसह जखमी विशाल नत्थू नैताम (२५) रा. कन्हाळगाव, निलेश तुळशीराम मेश्राम (३०) रा. कन्हाळगाव व प्रकाश जीवन सुरपाम (२२) रा. मारेगाव हे कन्हाळगाव कडे जात असतांना समोरून येणाऱ्या सिमेंट ट्रक एम.एच. ३४ एम. ७७३७ ट्रक भरधाव वेगाने आपली बाजू सोडून येत असतांना दोन्ही दुचाकींना जबर धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.  तिघा जखमींना प्राथमिक उपचारानंतर यवतमाळ येथे हलविण्यात आले. मृतक आजोबा आणि नातू हे खंडणी येथे जात होते. दरम्यान अपघात घडताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. अपघात ग्रस्तट्रक व चकणाचुर झालेल्या दोन मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-08-16


Related Photos