महत्वाच्या बातम्या

 छायाचित्र प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे 24 मार्च हा शेवटचा दिवस असणार आहे. शहरात होत असलेल्या जी-20 निमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

24 मार्चपर्यंत ही प्रदर्शनी सर्वांसाठी निःशुल्क खुली असणार आहे. झिरो माईलजवळील जिल्हा मध्यवर्ती संग्रहालयात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयांवरील दर्जेदार छायाचित्रे यावेळी पहायला मिळणार आहे. नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन आणि जिल्हा मध्यवर्ती संग्रहालय यांचे विशेष सहकार्य या प्रदर्शन आयोजनासाठी मिळाले आहे.

नागपूर शहरामध्ये जी -20 अंतर्गत सिव्हिल 20 या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या छायाचित्र स्पर्धेला छायाचित्रकारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.

जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos