महत्वाच्या बातम्या

 भिवकुंड कोळसा ब्लॉक वेकोलि कडे देण्याची मागणी


- माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन , विसापूर-नांदगावच्या ग्रामस्थांची रोजगार व विकासासाठी भूमिका

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीला देण्यात आलेल्या भिवकुंड कोळसा ब्लॉकमधील कोळसा उत्खननाचा कालावधी संपल्याने हा कोळसा ब्लॉक शासनाने तातडीने वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड या शासकीय कंपनीकडे वर्ग करावा आणि त्यामार्फत खाण प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी विसापूर व नांदगाव परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांनी केली आहे.

या मागणीसंदर्भात महाराष्ट्राच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन साद करण्यात आले. भिवकुंड कोळसा ब्लॉकचा पुढील विकास शासकीय उपक्रम असलेल्या वेकोलि मार्फत झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासोबतच परिसराच्या विकासालाही चालना मिळेल, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

विसापूर व नांदगाव परिसरातील नागरिकांच्या हिताचा विचार करून शासनाने भिवकुंड कोळसा ब्लॉकबाबत तातडीने निर्णय घ्यावा, तसेच तो वेकोलि कडे वर्ग करून शासकीय माध्यमातून कोळसा उत्खनन प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. खासगी कंपनीऐवजी शासकीय कंपनीमार्फत प्रकल्प राबवून स्थानिक नागरिकांच्या रोजगाराला आणि परिसराच्या विकासाला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.





  Print






Related Photos