शेतकऱ्यांना पिक विमा पॉलिसीचे वितरण : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विशेष मोहीम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत सध्या जिल्ह्यात माझी पॉलिसी माझ्या हातात ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा पॉलिसीची संपूर्ण माहिती देऊन पारदर्शकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्या पिक विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमांद्वारे प्रत्येक विमाधारक शेतकऱ्याला त्यांच्या पिक विमा पॉलिसीची छापील प्रत स्वत:च्या हातात दिली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याचे तपशील विमा रक्कम, पिकाचे नाव, विमा कंपनी तसेच दाव्याच्या प्रक्रियेची माहिती सहज उपलब्ध होत आहे, असे तालुका कृषि अधिकारी यांनी सांगितले. कार्यक्रमाला एन.डी. कडू तसेच कृषि विभागाचे प्रतिनिधी व भारतीय कृषि विमा कंपनीचे तालुका समन्वयक योगेश कामनापुरे व तालुका समन्वयक अमर कांबळे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Wardha




Petrol Price




