महत्वाच्या बातम्या

 महिलांवर आजही अनेक बंधने : सौ आशा सोनवणे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस             

प्रतिनिधी / आष्टी : महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग, लोकसंख्या विभाग व ग्रामीण रुग्णालय आष्टीच्या राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत किशोरवयीन मुलींची समस्या या विषयावर चर्चा करताना आजही जग चंद्रावर जात असले तरी जगातील सर्व महिलांवर आजही धार्मिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक अशी अनेक बंधने आहे आणि म्हणून महिलांच्या विकास करायचा असेल तर त्यांची ही जी बंधने आहे ती तोडावाच लागणार असे आव्हान आशा सोनवणे यांनी केले या राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्राचार्य संजय फुलझले प्रमुख अतिथी म्हणून प्रा. शाम कोरडे प्रा. रवी गजभिये प्रा. डॉ. राज मुसणे, प्रा. सालूलकर, प्रा. गबने, प्रा. ज्योती बोभाटे व अन्य मान्यवर उपस्थित होते विषयाचे प्रस्तावित करताना समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. भारत पांडे यांनी आधुनिक काळात देखील महिलांवर समाज व घरातून अनेक बंधने लादली जातात त्यामुळे ते कुठेही चर्चा करू शकत नाही म्हणून महिलांनी आता स्वावलंबी व्हावे तरच त्या या बंदनातून सुटतील असे विचार मांडले यावेळेला मुलींनी देखील आजपासून आम्ही आमच्या विचारात, आहारात परिवर्तन घडवून आणू व स्वावलंबितकडे वळू अशी हमी दिली त्यामुळे मुलींच्या विचारात परिवर्तन घडवून आले व त्यांनी आपल्या शारीरिक व मानसिक होणारे बदल परिवर्तन यावर सोनवणे यांच्याशी चर्चा केली व समाधान पूर्वक उत्तर मिळाल्यामुळे त्यांच्या मनातील प्रश्नांना विराम मिळाला.





Facebook    Twitter      
  Print






News - Gadchiroli | Posted : 2022-09-29




Related Photos