महत्वाच्या बातम्या

 उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्या : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर


- सेलू तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई आढावा

- आराखड्यासाठी वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सेलू तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई आराखड्याचा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आढावा घेतला. येत्या उन्हाळ्यात तालुक्यात कुठेही टंचाईची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता. आराखड्यातील प्रस्ताव वेळेत सादर करून वेळेत त्यावर कारवाई करा, असे निर्देश बैठकीत पालकमंत्र्यांनी दिले.

सेलू पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत पालकमंत्री बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसिलदार शकुंतला पाराजे, गट विकास अधिकारी देवानंद पाणबुडे, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक मुडे यांच्यासह पाणी टंचाईशी संबंधित विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक कुटूंबातील व्यक्तीला पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे धोरण आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यातीने विविध योजना राबवून प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी योजना राबविणाऱ्या यंत्रणांनी संयुक्तपणे टंचाई आराखडा राबवावा, डॉ.भोयर यांनी सांगितले.

पाणी टंचाई आराखडा तयार करतांना वाढीव लोकसंख्येचा विचार करावा. गावातील सार्वजनिक व खाजगी विहिरी, हातपंप, नळयोजनांच्या दुरुस्तीची कामे प्रस्तावित करावी. जलजीवन मिशन अंतर्गत घेण्यात आलेली अपुर्ण कामे तत्काळ पुर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री डॉ.भोयर यांनी यावेळी केल्यात. 

दरवर्षी टंचाई आराखड्याचे नियोजन आपण करतो. त्याप्रमाणे प्रस्ताव, मान्यता व प्रत्यक्ष कामे होणे आवश्यक आहे.ज्या ठिकाणी तातडीने कामे करणे आवश्यक आहे, तेथे उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच कामे होणे आवश्यक आहे. वेळेत काम न झाल्याने टंचाई परिस्थिती निर्माण झाली, असे होऊ नये. याबाबी पाहण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असेल, असे पालकमंत्री म्हणाले. बैठकीला सेलू तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, सरपंच व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

सेलू येथील विविध विकास कामाचे भूमीपूजन -
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते सेलू येथील प्रभाग क्रमांक ६,१४ व १६ मधील सिमेंट रस्ता व खुल्या जागेतील सौदर्यीकरण व कुंपन बांधकामे अशा  लाख रुपयाच्यां कामांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी सेलू नगर पंचायतच्या नगराध्यक्ष स्नेहल देवतारे,  मुख्याधिकारी अनुप अग्रवाल व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos