महत्वाच्या बातम्या

 डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / देसाईगंज : देसाईगंज येथील मोहसीनभाई जव्हेरी महाविद्यालयात ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे पितामह डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून नवागतांना वाचन प्रशिक्षण देण्यात आले. अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य डॉ. सुनील चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. नाजीम शेख व प्रा. सत्यनारायण पुसाला उपस्थित होते. सुनील चौधरी यांनी वाचन साहित्याचा वापर कसा करावा तथा वाचनाने आपल्या ज्ञानात भर पाडावे, असे प्रतिपादन केले. डॉ. नाजीम शेख यांनी ग्रंथालयातील असलेल्या विविध संदर्भ साहित्याविषयी माहिती दिली. ग्रंथालय कर्मचारी संजय बुराडे सूत्रसंचालन केले, तर प्रा. झोया सैय्यद यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी डॉ. कुशल लांजेवार, प्रा. कुणाल हिवसे, डॉ. गौरव निंबातें, डॉ. दीप्ती इंगोले, प्रा. सुचिता पेद्दीवर, डॉ. आशिष सेलोकर, प्रा. प्रवीण पत्रे, प्रा. सचिन लोणारे, प्रा. रामकृष्ण युरोजगार, डॉ. चंद्रकांत शेंडे, चंद्रकांत खोके, नंदकिशोर अटाळकर नंदकिशोर चहांदे, कपिल ढोरे, सतीश कोलावार यांनी सहकार्य केले.

Facebook    Twitter      
  Print


News - Gadchiroli | Posted : 2022-09-30
Related Photos