१८ लाखाहून अधिक किमतीचा दारू जप्ती मुद्देमालावर आष्टी पोलिसांनी फिरवला बुलडोझर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी : ३१ डिसेंबर च्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र दारूबंदी कायद्यान्वये तीव्र कारवाई सुरू करण्यात आली असून याच मोहिमेच्या अनुषंगाने २६ डिसेंबर २०२३ रोजी सन २०१६ ते २०२१ या कालावधीत आष्टी पोलिसांनी वेळोवेळी धाडी टाकून विविध गुन्ह्यात जप्त केले.
सदर गुन्ह्यातील जप्त केलेला १८ लाखाहून अधिक किमतीची दारू मुद्देमाल न्यायदंडाधिकारी चामोर्शी यांच्या आदेशान्वये व उत्पादन शुल्क विभाग गडचिरोली यांच्या परवानगीने पोलीस अधीक्षक निलोत्पाल गडचिरोली, अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश अहेरी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन तू. गावडे पोलीस स्टेशन आष्टी यांच्या उपस्थितीत निर्जन व सुरक्षित स्थळी सदर जप्त प्रो.वी. चा मुद्देमालावर बुलडोजर चालवून नाश करून त्याचा विल्हेवाट लावण्यात आला.
भविष्यात पोस्टे आष्टी हद्दीतील अवैध दारू विक्रेते व अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमांवर वेळोवेळी धाडी टाकून कार्यवाही करण्यात येत आहे.
News - Gadchiroli