चामोर्शी येथे राहुल नैताम व मित्र परिवारा तर्फे रक्तदान शिबिर संपन्न


- रक्त संबंधापेक्षा रक्तदान सर्वश्रेष्ठ दान : उद्घाटक जयश्री वायलालवार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : समाजातील जातीभेद व विषमता दूर करण्यासाठी रक्त संबंधापेक्षा रक्तदान श्रेष्ठ असून शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला मानव समाज निर्माण होण्यासाठी आज राहुल नैताम व मित्र परिवारातर्फे सलग १५ वर्षापासून चालू असलेले रक्तदान शिबीराचे आयोजन हे खरेच फार स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरव उद्गार जयश्री वायलालवार यांनी काढले .
त्या पुढे म्हणाले, आज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वर्गीय सुखदेवराव नैताम बहुउद्देशीय संस्था चामोर्शीच्या वतीने माजी नगरपंचायत उपाध्यक्ष तथा नगरसेवक राहुल सुखदेव नैताम व मित्र परिवारातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नगरपंचायत भवन चामोर्शी येथे करण्यात आलेले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, प्रमुख अतिथी तहसीलदार संजय नागटिळक, प्राचार्य हिराजी बनपूरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी. इनवाते नगरसेवक वैभव भिवापुरे, सुमित तुरे, निशांत नैताम, वर्षा भिवापुरे, प्रेमा आईंचवार, रोशनी वरघंटे, स्नेहा सातपुते, काजल नैताम, पंकज वायलालवार, अमोल आईंचवार, प्रा. पवन नाईक, स्वप्निल वरघंटे, वंदना मस्के, माजी सभापती विजय शातलवार, वामन किनेकार, गोकुळदास झाडे, विकास दूधबावरे व विविध संघटनाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी चामोर्शी शहरात नेहमी रुग्णसेवा देणाऱ्या ॲम्बुलन्स ड्रायव्हर अंकुश सोमनकर, राकेश वासेकर, राकेश सोमनकर, यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आय.जी. नागदेवते, नरेश कंदकुरे, समता खोब्रागडे, सतीश तडकलवार आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे रक्तदाते स्व:ताच रक्तदानासाठी आलेले होते. यावेळी एकूण ३०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर १५० हून अधिक रक्तदात्यांना वेळेअभावी परत जावे लागले. रक्तदात्यांना सुंदर टी-शर्ट व स्पोर्ट शूज देण्यात आले. भव्य रक्तदान शिबिरासाठी शहरातील २० हून अधिक सामाजिक संघटनांनी आपला सहभाग दर्शविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश खेवले तर आभार गजानन बारसागडे यांनी मानले. या भव्य रक्तदान शिबीरासाठी नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले .
News - Gadchiroli