महत्वाच्या बातम्या

 भुवनेश्वर : कंधमाल जिल्ह्यात माओवाद्यांशी भीषण चकमक, चार ठार


- गुम्मा जंगलात पोलिस आणि माओवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार, शस्त्रसाठा जप्त

विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / भुवनेश्वर : ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील बेलघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुम्मा जंगलात पोलिस आणि माओवाद्यांमध्ये गुरुवारी भीषण चकमक झाली. या चकमकीत चार माओवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, ठार झालेल्या माओवादींमध्ये बारी उर्फ राकेश (CPI माओवादी एरिया कमिटी सदस्य) आणि अमृत (दलम सदस्य) यांचा समावेश आहे. हे दोघेही छत्तीसगडचे रहिवासी होते आणि त्यांच्या विरोधात ₹२३.६५लाखांचे बक्षीस जाहीर होते.

चकमक कशी घडली? -
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ची एक लहान मोबाइल टीम गुम्मा जंगलात शोधमोहीम राबवत होती. याच दरम्यान, पोलिस आणि माओवाद्यांमध्ये तडकाफडकी चकमक झाली. या चकमकीत दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार केला, ज्यात चार माओवादी ठार झाले.

शस्त्रसाठा जप्त -
चकमक नंतर पोलिसांनी घटनास्थळावरून एक रिव्हॉल्व्हर, एक .३०३ रायफल आणि एक वॉकी-टॉकी सेट जप्त केला. या कारवाईत पोलिस दलाला कोणतीही हानी झाली नाही. सध्या पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोध मोहिम तीव्र केली आहे.

आत्मसमर्पणानंतर तातडीची कारवाई -
ही चकमक मलकानगिरी जिल्ह्यात २२ माओवाद्यांनी ओडिशाचे डीजीपी वाय. बी. खुराना यांच्यासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर अवघ्या एका दिवसात घडली. त्यामुळे राज्यातील माओवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

सुरक्षा दलाने या विजयाचे स्वागत करत, माओवाद्यांविरुद्धच्या कारवाईला आणखी गती देण्याचे संकेत दिले आहेत.





  Print






News - World




Related Photos