तालुका विज्ञान प्रदर्शनीची सांगता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : पंचायत समिती गडचिरोलीच्या वतीने वसंत विद्यालय गडचिरोली येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीची सांगता करण्यात आली. विद्यार्थ्यामध्ये शालेय जीवनापासून विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्याच्या उद्देशाने 9,10,11फेब्रुवारी 2023 ला तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम डॉ. सी. वी. रमण व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या महापुरुषाला माल्यार्पण करून मान्यवराच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
या समरोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पोरेड्डीवर हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वसंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संध्याताई पोरेड्डीवार, रमेश उचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक ) जिल्हा परिषद नारायण परांडे बालविकास अधिकारी, डी. डी. सोनटक्के, सुनील पोरेड्डीवार, यू. एन. राऊत, अविनाश वऱ्हाडे केंद्रप्रमुख, वसुधा रायपुरे, संचालन कु. बिसेन, आभार खोब्रागडे शिक्षण विस्तार अधिकारी, तसेच सर्व केंद्रप्रमुख इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र काटेंगे यांनी केले.
News - Gadchiroli