महत्वाच्या बातम्या

 उत्तम व निरोगी आयुष्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन गरजेचे : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार


- कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन- श्रीराम क्रीडा मंडळ मेहा (बूज) चा उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्र्पुर : युवकांनी क्रीडांच्या माध्यमातून उत्तम व निरोगी आयुष्य मिळवून गाव सेवा देशसेवेसाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सावली तालुक्यातील मेहा (बुज) येथे श्रीराम क्रीडा मंडळ द्वाराआयोजीत कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

याप्रसंगी प्रामुख्याने मंचावर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निखिल सुरमवार, युवक काँग्रेस ब्रह्मपुरी विधानसभा अध्यक्ष नितीन दुवावार, युवक काँग्रेस कार्यकर्ता निमगाव संकेत बल्लमवार, जितेंद्र धात्रक सावली तालुका माजी काँग्रेस अध्यक्ष राजू सिद्धम, बंडू बोरकुटे काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन गोहने, महिला काँग्रेस अध्यक्ष उषा भोयर, सरपंच रितेश रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, युवकांमध्ये खेळाडू वृत्ती जागृत झाल्याने व्यसनाधीनतेवर अंकुश लावता येते. सोबतच उत्तम दर्जाचा खेळ केल्यास राज्य पातळी देशपातळी व जागतिक पातळी पर्यंत नावलौकिकही मिळवता येते. खेळामुळे युवकांना उत्तम आरोग्य व निरोगी शरीर लाभून त्यांचे आयुष्य दीर्घायुष्य होते. म्हणून खेळाचे महत्व जाणून विविध क्रीडा स्पर्धांमधून आपल्या गावाचे नाव लौकिक करावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले. सावली तालुक्यातील मेहा (बुज) येथे प्रथमतः कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व सदर स्पर्धेमध्ये विविध गावातून एकूण ४० चमू सहभागी झाल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.





  Print






News - Chandrapur




Related Photos