महत्वाच्या बातम्या

 लसीकरणानंतरही गोवरने बाळाचा मृत्यू : एकूण १३ मृत्यूंची नोंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : मुंबईतील गोवरच्या साथीची तीव्रता दिवसेंदिवस भीषण होत आहे. दिवसभरात गोवरच्या १९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर शहर उपनगरात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी गोवरमुळे आणखी एका संशयित मृत्यूची नोंद झाली आहे. गोवंडी येथील अवघ्या आठ महिन्यांच्या मुलाचा बळी गेला आहे. या बाळाचे लसीकरण नियमित असून, मृत्यू झाल्याने वैद्यकीय तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

मुंबईत गोवरच्या रुग्णांची एकूण संख्या २५२ झाली असून, आतापर्यंत एकूण १३ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यातील दोन संशयित मृत्यू असून, तीन मृत्यू मुंबईच्या हद्दीतील नसल्याचे पालिकेने म्हटले आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बाळाचे नियमित लसीकरण झालेले असून, त्याला २० नोव्हेंबरला ताप, पुरळ येऊन श्वसनाचा त्रास उद्भवला. त्यामुळे पालिका रुग्णालयात दाखल केले होते. नंतर विशेष रुग्णालयात दाखल करत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मृत्यूचे कारण  मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम, ब्राँकोन्यूमोनिया आणि गोवर असल्याचे नमूद आहे. 

  Print


News - Rajy
Related Photos