गोवर - रूबेला लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा : डाॅ. मिलींद मेश्राम


- भामरागड तालुक्यात जनजागृती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
शासनाच्या वतीने येत्या २७ नोव्हेंबरपासून गोवर रूबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. १५ डिसेंबरपर्यंत लसीकरण करण्यात येणार असून या मोहिमे अंतर्गत शाळा, अंगणवाडी, रूग्णालय आणि भामरागड तालुक्यातील १२८ गावातील नागरिकांना कोतवालांच्या मदतीने मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे प्रत्येकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. मिलींद मेश्राम यांनी केले आहे.
गोवर हा विषाणू पासूून होणारा अत्यंत धोकादायक व जिवघेणा आजार आहे. या आजाराने बालकांना अपंगत्व व अवकाळी मृत्यूचा धोका असतो. रूबेला हासुध्दा विषाणूंपासून होणारा आजार असून गरोदर मातांना या रोगाची लागण होण्याची लक्षणे असतात. त्यामुळे या रोगांवर नियंत्रण आणण्याच्या हेतूने ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील बालकांच्या संरक्षणार्थ लसीकरण मोहित राबविण्यात येत आहे. 
तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मेश्राम यांनी विद्यार्थी, आशा वर्कर,  एएनएम परिचारीका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी आदींना गोवर रूबेला बाबतची प्रतिज्ञा दिली. प्रत्येक गावामध्ये तसेच तालुका स्तरावर आठवडी बाजाराच्या दिवशी गोवर रूबेला लसीकरण मोहिमेचा प्रचार व जनजागृती करण्यात येत आहे. भामरागड तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून प्रचार करण्यात येत आहे. तालुक्यातील आशा कार्यकर्तीपासून तर तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेवून जबाबदारी सोपविण्यात आली. ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. टास्क फोर्स समितीसुध्दा तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील, संवर्ग विकास अधिकारी चन्नावार, गटशिक्षणाधिकारी सोनवाणे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी या सर्वांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 
भामरागड तालुक्यातील एकूण ५ हजार ३७३ विद्यार्थी तसेच अंगणवाडीतील ४ हजार ७६३ बालके अशा एकूण १० हजार १३६ बालकांना गोवर रूबेलाची लस देण्यात येणार आहे. शासनातर्फे राबविल्या जात असलेल्या या अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मिलींद मेश्राम यांनी केले आहे.
लोकबिरादरी प्रकल्पाच्या संचालिका डॉ. अनघा आमटे यांनीसुद्धा तालुक्यातील नागरिकांना माडिया भाषेतून लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याबाबत आवाहन केले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-23


Related Photos