महत्वाच्या बातम्या

 पार्टीने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी : आमदार डॉ. देवराव होळी


- आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रमूख उपस्थितीमध्ये चामोर्शी तालुका शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक संपन्न
- बैठकीत उपस्थित शक्ती केंद्र प्रमुखांना आमदार डॉ. देवराव होळी यांचे मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

 प्रतिनिधी / चामोर्शी : पार्टीने सोपवीलेल्या कामांचे नियोजन व आयोजन करून सोपवलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी, असे आवाहन आमदार डॉ.  देवराव होळी यांनी चामोर्शी तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुखांच्या बैठकीत उपस्थित शक्ती केंद्रप्रमुखांना मार्गदर्शन करताना केले. आमदार डॉ. देवराव होळी यांच्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयाच्या सभागृहामध्ये सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीला भाजपा जिल्हा महामंत्री संघटन रवींद्र ओल्लारवार, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तथा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे तालुक्याचे अध्यक्ष दिलीप चलाख, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, यांचे सह प्रमुख पदाधिकारी व शक्ती केंद्रप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी बैठकीत उपस्थित शक्ती केंद्रप्रमुखांना पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडून आपले कार्य पुर्ण करावे असे आवाहन केले.

  Print


News - Gadchiroli
Related Photos