चंद्रपुर : ए टू झेड सेलला भीषण आग, परिसरातील घरेही आगीच्या कवेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील गजबजलेल्या तुकुम परिसरात असलेल्या ए टू झी बाजाराला शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीने परिसरातील काही घरानांही कवेत घेतले.
अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज आहे.
माहितीनुसार, तुकुम भागात गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या गृह उपयोगी स्वस्त वस्तु मिळणाऱ्या ए टू झेड बाजाराला भीषण आग लागल्याचे लक्षात आले. या परिसरात अनेक दुकाने तसेच हॉटेल असुन मागील अडीच तासापासून ही आग भडकत आहे.
आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखुन अग्निशमन विभागाला कळविले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ ते दहा गाड्या आग विझविण्याचा प्रयत्न करत असुन वृत्त लिहीपर्यंत आगीवर नियंत्रण मिळालेले नाही.
News - Chandrapur




Petrol Price




