माजी आ. दीपक आत्राम, जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते अभिनेता चिरंजीवी चा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
 प्रतिनिधी/ गडचिरोली :
‘मी हनुमंता रिक्शावाला’ या चित्रपटाद्वारे दुर्गम भागातील पेरमिली गावातील युवक चिरंजीवी गड्डमवार याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या होतकरू अभिनेत्याचा आविसचे नेते माजी आमदार दीपक आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते आज ८ डिसेंबर रोजी आलापल्ली येथे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी गणेश दुर्गे, विशाल रापेल्लीवार, प्रशांत ठेपाले, बंडू मोहुर्ले, वसंत निकुरे, धर्माजी गुरनुले, लक्ष्मण मोहुर्ले, प्रभाकर गुरनुले, आलापल्लीचे माजी सरपंच विजय कुसनाके, आविसचे सल्लागार  जुनेद शेख, संदिप बडगे, राकेश सडमेक आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील होतकरू कलावंतांना संधी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू. आलापल्ली येथे भव्य रंगमंच निर्माण करून कला गुणांना चालना मिळवूण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार म्हणाले. दुर्गम भागातील युवकाने चित्रपटसृष्टीत घेतलेली गगनभरारी अभिमानास्पद आहे, असेही गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-08


Related Photos