दडपशाही सरकारची सत्ता उलथुन लावण्यासाठीच महा पर्दाफाश सभा : माजी खासदार नाना पटोले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
सद्या देशामध्ये गल्ली ते दिल्लीपर्यंत विरोधी पक्षाला टार्गेट करत अनेक चौकशा लावल्या जात असुन स्वतः कैलेले पाप लपवण्यासाठी दडपशाहीचा वापर करून विरोधकांना खिळखिळे करण्याचा प्रयत्न चालवल्या जात आहे. या दडपशाहीच्या विरोधात यांचा पर्दाफाश करण्याच्याच्या उद्देशानेच ही महा पर्दाफाश सभा असुन आपण सर्वांनी या फेकु सरकारची सत्ता उलथुन लावणारच असल्याचे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले. 
ते देसाईगंज येथील हटभार सभागृहात महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटी निवडणु प्रचार समितीच्या वतीने आयोजित महा पर्दाफाश सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.  यावेळी मंचावर डाॅ. नामदेव उसेंडी. माजी आमदार आनंदराव गेडाम, अॅड. संजय गुरू,जिवन नाट, प्रभाकर तुलावी,भागवत नाकाडे, शिला पटले, मनिषा दोनाडकर, रविंद्र दरेकर,जेसा मोटवानी,  गोविंद भेंडारकर, नगरसेवक आरीफ खानानी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. 
      विद्यमान शासनातील लोकांनी खोटा प्रचार करून देशातील जनतेला मुर्ख बनवले. लोकशाही मार्गाने निवडणुकांना सामोरे जाण्या ऐवजी दंडुकशाहीचा वापर करून इव्हिएमच्या घोटाळ्याच्या माध्यमातून सत्ता हस्तगत केली आहे. प्रधानमंञी पिकविमा योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना मुर्ख बनवले, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींना जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करण्याचे आश्वासन वेळोवेळी दिले,माञ अद्यापही अध्यादेश काढण्याऐवजी दडपून ठेवण्याचं काम या शासनाने करून जिल्ह्यातील ओबीसींना त्यांच्या घटनादत्त अधिकारांपासुन वंचित ठेऊन जिल्ह्यात एक टक्केही नसलेल्या मराठा समाजाला तेरा टक्के आरक्षण तर सुवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याचं पाप या महाठग शासनाने करून जिल्ह्यातील ओबीसीवर फार मोठा अन्याय केला आहे. राज्यात विस हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या असताना कर्जमाफिचा घोळ अद्यापही कायम ठेव ला आहे. 
     देशात बेरोजगारीचा भस्मासूर वाढु लागला आहे, शेतक-यांची अवस्था ना घरका ना घटका अशिच झाली असुन ज्या संविधानाच्या भरोशावर एक चायवाला या देशाचा पंतप्रधान झाला त्याच संविधानाला जाळण्याचं पाप या सरकारच्या काळात होऊन सुद्धा आरोपी अद्यापही मोकाट असल्याचा घणाघती आरोपही त्यांनी केला असुन आपले सरकार सत्तेत येताच सुरजागड लोह प्रकल्प मार्गी लावुन लगतच्या चारही जिल्ह्यातील तरूण बेरोजगारांना काम देऊन जिल्हे सुजलाम सुफलाम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
    कार्यक्रमाचे संचालन परसराम टिकले, प्रास्ताविक संजय गुरू तर आभार  भुषण अलामे यांनी मानले.कार्यक्रमाला कोरची, कुरखेडा, देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील काॅग्रेस कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-28


Related Photos