आजचे दिविशेष


२६ नोव्हेंबर महत्वाच्या घटना
१८६३ : अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.
१९४१ : लेबेनॉन हा देश स्वतंत्र झाला.
१९४९ : भारताची घटना मंजूर झाली.
१९४९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.
१९६५ : अॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.
१९८२ : दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.
१९९७ : शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
१९९८ : खाणा रेल्वे अपघातात २१२ जणांचा मृत्यू झाला.
१९९९ : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.
२००८ : महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.
२००८ : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैय्यबा ने मुंबई येथे दहशदवाद्याचा आतंकवादी हल्ला. या घटनेला २६/११ म्हणून ओळखले जाते.
१९४९ : संविधान दिन.
२६ नोव्हेंबर जन्म
१८८५ : वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९७५)
१८९०: भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १९७७)
१८९८ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायन शास्रज्ञ कार्ल झीगलर यांचा जन्म.
१९०२ : मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९७१)
१९०४ : भारतीय कवि, विद्वान, लेखक, तत्वज्ञानी के. डी. सेठना यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०११)
१९९१ : भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०११)
१९२१ : भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ – नडियाद, गुजराथ)
१९२३ : चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९७५ – मुंबई)
१९२३ : भारतीय सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २०१४)
१९२४ : भारतीय क्रिकेटपटू जसुभाई पटेल यांचा जन्म.
१९२६ : भारतीय राजकारणी रवी रे यांचा जन्म.
१९२६ : कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म.
१९३८ : ऑस्ट्रेलियन भौतिकशास्रज्ञ रॉडनी जोरी यांचा जन्म.
१९३९ : अमेरिकन-स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका टीना टर्नर यांचा जन्म.
१९४९ : पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान मारी अल्कातीरी यांचा जन्म.
१९५४ : एल. टी. टी. ई. चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २००९)
१९६१ : कोबरा बीयरचे सहसंस्थापक करण बिलिमोरिया यांचा जन्म.
१९७२ : हिंदी चित्रपट अभिनेते अर्जुन रामपाल यांचा जन्म.
१९८३ : फेसबुकचे सहसंस्थापक क्रिस ह्यूजेस यांचा जन्म.
१९३३ : इन्स्टंट रीप्लेचे संशोधक, अमेरिकन दिग्दर्शक आणि निर्माते टोनी वेर्ना यांचा जन्म (मृत्यू : १८ जानेवारी २०१५
१९३३ : भारतीय लेखक आणि राजकारणी गोविंद पानसरे यांचा जन्म (मृत्यू : २० फेब्रुवारी २०१५)
१९१९ : भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचा जन्म (मृत्यू : २० ऑगस्ट २०११)
१८९५ : अल्कोहोलिक्स एनोनिमसचे सह-संस्थापक, अमेरिकन कार्यकर्ते बिल डब्ल्यू. यांचा जन्म (मृत्यू : २४ जानेवारी १९७१)
१८२८ : फ्रान्स देशाचे ५२वे पंतप्रधान रेने गॉब्लेट यांचा जन्म (मृत्यू : १३ सप्टेंबर १९०५)
२६ नोव्हेंबर मृत्यू
१९८५ : कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १८९९)
१९९४ : चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन. (जन्म: २ मे १८९९)
१९९९ : पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक दत्तात्रय शंकर जमदग्नी यांचे निधन.
२००१ : शिल्पकार चंद्रकांत कृष्णाजी जगताप यांचे निधन.
२००८ : मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामते यांच्यासह १७ पोलीस कर्मचारी शहीद.
२०१२ : भारतीय लेखक आणि अनुवादक एम सी सी नंबुदीपदी यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९१९)
२०१६ : रशियन विमान मिग-२९ चे सह-निर्माता आणि डिझायनर इव्हान मिकोयान यांचे निधन.
२०२० : भारतीय उद्योजक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक - पद्म विभूषण फकीर चंद कोहली यांचे निधन (जन्म: १९ मार्च १९२४)
२०१२ : अमेरिकन सर्जन आणि सैनिक - नोबेल पुरस्कार विजेते जोसेफ मरे यांचे निधन (जन्म: १ एप्रिल १९१९)
२००८ : भारतीय शहीद पोलिस कमिशनर - अशोकचक्र - अशोक कामटे यांचे निधन (जन्म: २३ फेब्रुवारी १९६५)
१९७७ : जपानी ४३वे योकोझुना सुमो पैलवान योशीबायामा जुंनोसुके यांचे निधन (जन्म: ३ एप्रिल १९२०)
१९७१ : इटालियन धर्मगुरू, सेंट पॉल सोसायटीचे संस्थापक जेम्स अल्बेरियोन यांचे निधन (जन्म: ४ एप्रिल १८८४)
१९५७ : ग्रीस देशाचे १३६वे पंतप्रधान पेट्रोस व्होल्गारिस यांचे निधन (जन्म: १३ सप्टेंबर १८८३)
१९४३ : अमेरिकन नौदल वैमानिक, दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेचे पहिले फ्लाइंग ऐस लेफ्टनंट एडवर्ड ओहेअर यांचे निधन (जन्म: १३ मार्च १९१४)
१९२६ : ब्राउनिंग आर्म्स कंपनीचे संस्थापक, अमेरिकन शस्त्र-रचनाकार जॉन ब्राउनिंग यांचे निधन (जन्म: २३ जानेवारी १८५५)
१९१५ : कॅनेडियन उद्योगपती, बर्पी सीड्सचे संस्थापक वॉशिंग्टन ऍटली बर्पी यांचे निधन (जन्म: ५ एप्रिल १८५८)




Petrol Price




