महत्वाच्या बातम्या

 केंद्रीय पथकाने घेतला जलशक्ती अभियानाचा आढावा


- आज जलशक्ती अभियानातील कामाची करणार पाहणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : केंद्रीय जलशक्ती अभियानाचे दोन सदस्यीय केंद्रीय पथक जिल्ह्याच्या दौ-यावर असून आज पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील झालेल्या कामाचा आढावा घेतला.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे उपसचिव अनिल भांदोला आणि सेंटर वॉटर पावर रिसर्च स्टेशन पुणेच्या लता गुप्ता हे दोन सदस्यीय केंद्रीय पथक वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा जलसंधारण अधिकारी विपिन साखरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फनसे, उपविभागीय  जलसंधारण अधिकारी अक्षय बेंद्रे यांनी वर्धा जिल्ह्यात विविध विभागाच्या माध्यमातुन जलसंधारणाच्या केलेल्या कामाची माहिती केंद्रीय पथकांना सादरीकरणाव्दारे दिली.

उद्या 3 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील वर्धा शहरातील कामे, सिंदी मेघे, देवळी तालुक्यातील चिखली, चना (टाकळी) व कोल्हापूर येथील झालेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी केंद्रीय पथक करणार आहे.

यात वॉटरशेड, गॅबीयन बंधारा, कोल्हापूरी बंधारा, वृक्ष लागवड, रेन वॉटर हॉर्वेस्टींग, तलाव आदी कामे  पाण्याची समस्या सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सादरीकरण करण्यात आले.

केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानाची सुरुवात २९ मार्च २०२२ रोजी करण्यात आली. कॅच दी रेन, व्हेअर इट फाल अँड व्हेन इट फाल हे या अभियानाचे घोषवाक्य आहे.

बैठकीला जलशक्ती अभियान राबविण्यात येत असलेल्या संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos