आयटकच्या नेतृत्वात विविध कर्मचारी, कामगार संघटनांनी केले जेलभरो आंदोलन


- शेकडोंना अटक व सुटका
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, हातपंप देखभाल दुरूस्ती कामगार आदींनी आयटकच्या नेतृत्वात आज गडचिरोली येथे देशव्यापी जेलभरो आंदोलन केले.
धानोरा मार्गाने शेकडो महिला कर्मचाऱ्यांची रॅली काढण्यात आली. ही रॅली इंदिरा गांधी चौकात येताच रास्ता रोको करण्यात आला. यावेळी चारही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चौकामध्ये चारही बाजूने महिलांनी घेराव घातला. यामुळे वाहतूक खोळंबली. विविध घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. सर्वांना पोलिस ठाण्यात नेल्यानंतर काही काळानंतर सुटका करण्यात आली आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील कर्मचारी, कामगार सहभागी झाल्या होत्या.
News - Gadchiroli | Posted : 2018-09-08