शासकीय आश्रम शाळा व निवासी शाळेत चिंतामुक्त अभ्यासक्रम मार्गदर्शन व आरोग्य तपासणी शिबिर


- सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळा हैबतपुर येथे विद्यार्थ्यासाठी चिंतामुक्त अभ्यास कसा करावा याबाबत मार्गदर्शन शिबिराचे तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, आष्टी येथे मुलींसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सामाजिक न्याय विभागाद्वारे करण्यात आले.
समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अंकेश केदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. हैबतपूर येथे आयोजित शिबिरामध्ये चिंतामुक्त अभ्यास कसा करावा या विषयावर वनविभागाच्या अधिकारी शारदा मुन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभ्यासाचे योग्य नियोजन, मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन आणि परीक्षेच्या काळात चिंतामुक्त राहून अभ्यास कसा करावा याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या मनातील शंका व अडचणींचे निराकरण करण्यात आले. या संवादात्मक सत्रामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास तसेच मानसिक दडपण दूर करण्यास मदत झाली. आष्टी येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरामध्ये वसतिगृहातील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या आरोग्याची सखोल तपासणी करून घेतली. तपासणी शिबिर आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आले. कार्यक्रमाला वसतीगृहाचे गृहपाल, मुख्याद्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




