फटाका विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरुपातील परवानासाठी अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूजएक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील सर्व तात्पुरत्या फटाका विक्री परवानाधारकांना तसेच नव्याने तात्पुरत्या फटाका परवाना घेणाऱ्यांना दिवाळी या सणानिमित्त ज्यांना फटाका विक्रीचे तात्पुरता परवाना आवश्यक आहे.  या सर्व फटाका विक्रेत्यांनी जिल्हादंडाधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयात १५ ऑक्टोबर पुर्वी आपले अर्ज सादर करावेत.
 या मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. तसेच यापुर्वी निर्गमित करण्यात आलेल्या सर्व तात्पुरते परवान्याचे नुतनीकरण होणार नसल्याने, गडचिरोली जिल्हयातील सर्व तात्पुरत्या फटाका विक्री परवानाधारकांनी फटाका विक्री परवानासाठी नव्याने अर्ज करणे बंधनकारक राहील.  तसेच तात्पुरत्या फटाका विक्री परवान्यासाठी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. नाहरकत प्रमाणपत्र त्वरीत निर्गमित करण्यासाठी पोलीस अधिक्षक गडचिरोली तसेच संबंधित तहसिलदार, नगर परिषद / नगर पंचायत/ ग्रामपंचायत यांना आवश्यक सुचना देण्यात आलेल्या आहेत.
  अर्ज सादर करतांना विहीत नमुन्यातील अर्ज असावा. नगरपरिषद / नगरपंचायत / ग्रामपंचायत यांचा नाहरकत प्रमाणपत्र, पोलीस अधिक्षक यांचे चारित्र्य प्रमाणपत्र व तात्पुरता फटाका परवाना मंजूरीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, ज्या जागेवर फटाका विक्री करणार आहेत त्या ठिकाणच्या जागेचा / इमारतीचा नकाशा व अभिलेख, दुकानासाठी वापरणार असलेल्या इमारतीच्या किंवा खुल्या जागेच्या मालकाचे संमतीपत्र व आधारकार्ड  अर्जासोबत जोडावे.  अर्जदार यांनी ज्या ठिकाणी फटाका साठवणूक / विक्री करणार असल्याचे नमुद करेल त्या ठिकाणच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी फटाका साठवणूक / विक्री करता येणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी  दिली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-06


Related Photos