नक्षल्यांचे क्रौर्य : छत्तीसगढमध्ये तीन तरुणांना जिवंत जाळले


वृत्तसंस्था / रायपूर :  उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथून ट्रकचे भाडे घेऊन छत्तीसगढमधील रायपूर येथे निघालेल्या तीन तरुणांना छत्तीसगढमध्ये काही नक्षलवाद्यांनी जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे.
 काही सामानाची डिलिव्हरी करायची असल्याने ट्रक मालकाने आपला भाऊ, एक चालक, एका हेल्परला घेऊन निघाला होता. मात्र, सोमवारी रायपूरमधील एका नाल्यामध्ये या तिघांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. नक्षलवाद्यांनीच या हत्या केल्या असाव्यात असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेशातील कठफोरी येथील रहिवासी असलेले हरिदत्त हे ट्रकचे मालक असून ते ट्रक भाड्याने देतात. चार ऑगस्ट रोजी त्यांनी गाजियाबादहून रायपूरसाठी एक भाडे मिळाले होते. हे भाडे घेऊन जाण्यासाठी त्यांनी आपला भाऊ संजू बघेल (वय २८), दिनेश (३२), मुलगा गंगादास, राजकिशोर आणि रामचंद्र यांना घेऊन सिरसागंज येथून ट्रक घेऊन गाजियाबादला पाठवले. त्यानंतर येथून तीन लोकांनी या ट्रकमध्ये माल भरून ते रायपूरच्या दिशेने रवाना झाले. सात ऑगस्ट रोजी जेव्हा अंजूने आपला भाऊ संजूला आपण २० किमी मागे असून एक दोन तासांत गोदापर्यंत पोहोचू असे फोनवर सांगितले होते. मात्र, त्यानंतरपासूनच तिघांचे मोबाईल बंद झाले. सात ऑगस्ट रोजी संध्याकाळी कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी रायपूरकडे त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. सोमवारी सकाळी पोलिसांना रायपूरपासून वीस किमी अंतरापूर्वीच एका नाल्यात तीन जळालेल्या अवस्थेतील मृतदेह मिळाले. या तिनही मृतदेहांची अंजूने ओळख पटवली. मात्र, माल ट्रक  गायब झाला आहे.  Print


News - World | Posted : 2018-08-14


Related Photos