ग्रामविकासासाठी ९ हजार २८० कोटींची तरतूद : पायाभूत सुविधांचा विकासांना प्राधान्य
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात पायाभूत सुविधा उभारताना दळणवळणावर अधिक भर देण्यात आला आहे. रस्त्यांचा विकास, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील मिहान प्रकल्प, कोल्हापूर विमानतळ, अमरावती, नवी मुंबई विमानतळाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
रस्ते विकास -
स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत, विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत करण्यात येणार आहे.
विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरिता भूसंपादनासाठी २२ हजार २२५ कोटी रुपयांची तरतूद
पुणे चक्राकार वळण मार्गाच्या भूसंपादनासाठी १० हजार ५१९ कोटींची तरतूद
जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी २ हजार ८८६ कोटींची तरतूद.
सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता नगरविकास विभागाला १० हजार ६२९ कोटी रुपये
सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाला १९ हजार ९३६ कोटी रुपये नियतव्यय मंजूर
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ॲन्युईटी योजना भाग-२ अंतर्गत ७ हजार ५०० किलोमीटर रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ मधील १० हजार किमी रस्त्यांव्यतिरिक्त ७,६०० कोटी खर्चून ७ हजार कि.मी.च्या रस्त्यांची दर्जोन्नती केली जाणार आहे.
बंदर विकासाला चालना -
जेएनपीटीचे सॅटेलाइट पोर्ट म्हणून वाढवण बंदर विकास प्रकल्पात महाराष्ट्र सागरी मंडळाचा २६ टक्के सहभाग. या प्रकल्पाची एकूण किंमत ७६ हजार २२० कोटी रुपये एवढी आहे.
जिल्ह्यातील भगवती बंदर विकासासाठी ३०० कोटी रुपये, रायगड जिल्ह्यातील सागरी दुर्ग जंजिरा १११ कोटी रुपये, मुंबईतील एलिफंटा येथे ८८ कोटी रुपयांची बंदर विकासाची कामे हाती घेण्यात येणार
सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब येथे सुसज्ज जेट्टीसाठी २२९ कोटी २७ लाखांची तरतूद.
रेल्वे प्रकल्प -
चिमूर-वरोरा, जालना-जळगाव आणि नांदेड-बिदर या नवीन रेल्वेमार्गांकरिता ५० टक्के आर्थिक सहभाग. आदिलाबाद-माहूर-वाशिम, शकुंतला रेल्वे ५० टक्के आर्थिक सहभाग देणार.
विमानतळ विस्तार -
शिर्डी विमानतळाच्या टर्मिनलचे काम सुरू करणार, छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या भूसंपादनासाठी ५७८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी.
News - Rajy