महत्वाच्या बातम्या

 उमेदच्या प्रक्रिया उद्योगाला भीषण आग : आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) कुरखेडा तालुक्यातील रामगड येथील प्रकिया उद्योगाच्या युनिटला काल (रविवार) रात्री भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे यंत्रसामग्री व अन्य साहित्य जळून खाक झाले.

उमेद प्रकल्पांतर्गत जिल्हाभर महिला बचत गट कार्यरत असून अनेक बचत गट फळे आणि वनोजपजावर आधारित प्रक्रिया उद्योग चालवीत आहेत. असेच जांभूळ व सीताफळ प्रक्रिया उद्योगाचे युनिट रामगड येथे आहे. परंतु मध्यरात्री या युनिटला अचानक भीषण आग लागली. पहाटे आग लागल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केले. कुरखेडा येथून अग्निशमन वाहनही बोलावण्यात आले. परंतु तोपर्यंत बॅटऱ्या, यंत्रे, कॅरेट, पल्प, बिया, फर्निचर आणि कागदपत्रे जळून खाक झाले होते. या आगीमुळे उमेदचे सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

प्रकिया उद्योगामुळे शेकडो महिलांना रोजगार मिळाला असून त्या स्वयंभू झाल्या आहेत. मात्र, आग लागल्याने त्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. ही आग कशामुळे लागली. हे अद्याप कळू शकले नाही. कोणी जाणीवपूर्वक तर आग लावली नाही. या विषयीचे सत्य पोलिस तपासात पुढे येईल. आज सकाळी जीवनोन्नती अभियानाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केले. या विषयी पुराडा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याची माहिती जिल्हा अभियान व्यवस्थापक प्रफुल्ल भोपये यांनी दिले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos