महत्वाच्या बातम्या

 २४ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्ट मिट क्रीडा महोत्सव - २०२२


- व्हॉलीबॉल स्पर्धेकरीता महिला व पुरुष संघ घोषित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे ०३ ते ०७ डिसेंबर दरम्यान होणा-या २४ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्टस् मिट क्रीडा महोत्सव - २०२२ व्हॉलीबॉल स्पर्धेकरीता महिला व पुरुष संघ घोषित झाला असून खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे २० ते २९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान होणार आहे.

 महिला व्हॉलीबॉल संघ 

महिला खेळाडूंमध्ये इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगावची मयुरी चौधरी व वंशिका कन्नाके, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची निशा रानी, प्रियंका करमकर व सगुन दुबे, कला व विज्ञान महाविद्यालय, कु-हाची रोहिणी गायगोले व अश्विनी गायगोले, एस.पी.एम.विज्ञान व गिलानी कला महाविद्यालय, घाटंजीची  श्रृतिका सोईतकर व  कोमल रोंघे, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीची क दिव्या बोबडे, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाची श्रृतिका नुतीवार व जिया कोटक, अमोलकचंद विधी महाविद्यालय, यवतमाळची समिक्षा दिवेकर, शिवाजी  कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची चल्लवी पाटील, एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोलाची ऋषाली पोटदुखे हिचा समावेश आहे.

पुरुष व्हॉलीबॉल संघ 

पुरुष खेळाडूंमध्ये श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा अर्शद सिध्दीकी, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीचा मुफिज अब्दुल व यासिर खान, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा प्रणय बोरकर, आदर्श राऊत, मित्रजीत बोरो व राहुल रॉय, एस.पी.एम. गिलानी महाविद्यालय, घाटंजीचा हरीवंश राठोड व पियुष जांभुळकर, जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदूरबाजारचा गौरव भोंगाडे, महात्मा फुले महाविद्यालय, वरूडचा ओम भोसले, श्री शिवाजी महाविद्यालय, अमरावतीचा संकेत देशमुख, श्रीमती एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोलाचा सलमान खान पठाण, श्री शिवाजी महाविद्यालय, अकोलाचा निखिल चव्हाण, कला व विज्ञान महाविद्यालय, कु-हाचा अभिजित दाभाडे, सिताबाई कला महाविद्यालय, अकोलाचा आनंद म्हस्के याचा समावेश आहे.
सर्व खेळाडूंनी प्रशिक्षण शिबिराला उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos