महत्वाच्या बातम्या

 कीटकनाशके व अन्नद्रव्ये खरेदीवर ५० टक्के अनुदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनांतर्गत शेतकऱ्यांना किडनाशके व अन्नद्रव्ये खरेदीसाठी खरेदी किंमतीच्या ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी खरेदीची देयके नजीकच्या कृषि कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विविध योजनेंतर्गत खरीप व रब्बी हंगामामध्ये कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीन व हरभरा पिकावर एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तसेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनांतर्गत किडनाशके व सुक्ष्ममूलद्रव्ये व जैविक खते विद्यापिठाच्या शिफारशीनुसार फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांना खरेदीच्या ५० टक्के किंवा २ हेक्टर क्षेत्रापर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनमध्ये सुक्ष्ममुलद्रव्यांकरिता किंमतीच्या ५० टक्के किंवा रुपये ५०० प्रति हेक्टर, जिप्सम, सल्फर किंमतीच्या ५० टक्के किंवा रुपये ७५० प्रति हेक्टर तसेच जैविक खतांकरीता ५० टक्के किंवा रुपये ३०० प्रति हेक्टर यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे.

एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनमध्ये पिक संरक्षण औषधी किडनाशके, तणनाशके व जैविक कीड नियंत्रणकरिता किंमतीच्या ५० टक्के किंवा रुपये ५०० प्रति हेक्टर यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. यासाठी  शेतकऱ्यांनी किडनाशके, अन्नद्रव्ये बाजारातून खरेदी करून सादर करावी. त्यानंतर अनुदानाची रक्कन शेतकऱ्यांचा खात्यावर थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने वर्ग करण्यात येणार आहे.

अनुदानासाठी शेतकऱ्यांनी ३० डिसेंबरपूर्वी खरेदी देयके नजीकच्या कृषि सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे जमा करावी. लाभार्थी शेतकऱ्यांनी जीएसटी क्रमांक असलेली खरेदी पावती सादर करणे बंधनकारक आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos