महत्वाच्या बातम्या

 भारतीय जनता पार्टी १२- गडचिरोली- चिमूर लोकसभा कोर कमिटीची महत्वपूर्ण बैठक संपन्न


- विदर्भ संघटन मंत्री डाॅ. उपेंद्र कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.  

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर (ब्रह्मपुरी) : भारतीय जनता पार्टी १२- गडचिरोली- चिमुर लोकसभा कोर कमिटीची महत्वपूर्ण बैठक गोसीखुर्द रेस्ट हाऊस ता. ब्रम्हपुरी येथे घेण्यात आली.

प्रामुख्याने बैठकीला आमदार कृष्णा गजबे, लोकसभा संयोजक तथा माजी आमदार प्रा. अतुल देशकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार संजय पुराम, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, कादर शेख, रविंद्र ओल्लालवार, सदानंद कुथे, झामसिंग येरणे, संजय गजपुरे, गणेश तडवेकर, अरविंद नंदूरकर, योगीता पिपरे, गिता हिंगे, सुयोग बाळबुद्धे, अनिल येरणे, रमेश बारसागडे, भारत खटी प्रमोद संगीडवार, आदी उपस्थिती होते.

या बैठकीला बुथ विषयी संखोल चर्चा करून बुथ वॉरियर्स विशेष येणाऱ्या पुढील निवडणूकीत महत्वपूर्ण जबाबदारी तसेच पदाधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत असतांना पक्ष संघटनेत बुथ सशक्तीकरण कसे आहे. यावर भाजपा संघटनेचे धोरण व पक्ष संघटनात्मक जबाबदारी व बुथ वॉरियर्स यावर विशेषतःभर देण्यात आली.

आगामी २०२३-२४ च्या लोकसभा लढाईसाठी विशेषतः सोशल मिडीयावर आणखी सज्ज व सक्रिय व्होने गरजेचे असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेसाठी कामाला लागण्याच्या सूचना बैठकी दरम्यान विदर्भ संघटन मंत्री डाॅ. उपेंद्र कोठेकर यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना विशेष सुचना करत मार्गदर्शन केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos