महत्वाच्या बातम्या

 स्वसंस्कृतीची जोपासना व त्याचे संरक्षण करण्याचे महत्वपुर्ण कार्य दत्त संप्रदायाने केले : आ. किशोर जोरगेवार


- श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास बाल संस्कार केंद्राच्या वतीने दत्त जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास बाल संस्कार केंद्राच्या वतीने धार्मीक व आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे काम केल्या जात आहे. येणाऱ्या पिढीपुढे आपल्या संस्कृतीची छाप पाडण्याचे कार्य यातुन घडत आहे. सामाजिक सार्वजनिक जिवनात अध्यात्माचे मोठे महत्व आहे. सूशिक्षीत झाल्यानंतर सुसंस्कृत होण्यासाठी अध्यात्माची गरज असते. स्वसंस्कृतीची जोपासना व त्याचे संरक्षण करण्याचे महत्वपुर्ण कार्य दत्त संप्रदायांच्या वतीने केल्या जात असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास बाल संस्कार केंद्राच्या वतीने दत्त जयंती निमित्त तुकुम येथे गुरुचरित्राचे पारायनाचे आयोजन करण्यात आले होते. आज दत्त जयंती निमित्त सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला डॉ. भारती दुधानी, श्री स्वामी समर्थ ट्रस्टचे केंद्र प्रमुख सुधाकर टिकले, माजी नगर सेविका शिला चव्हाण, माया उईके, हनुमान मंदिरचे अध्यक्ष वेगीनवार, बोक्कावार, वसंतराव धंदरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, चंद्रपूरात विविध धर्मीय सन - उत्सव गुण्यागोविंदाने साजरे केल्या जातात. चंद्रपूर जिल्ह्याला मोठे धार्मिक महत्व आहे. गोंडकालीन इतिहास लाभलेल्या या जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे आहे. या मंदिराचा सर्व्हे करुन तेथे विकास कामे करण्याचे संकल्प आपण केला आहे. मतदार संघातील माता मंदिरांचेही आपण सौदर्यीकरण करणार आहोत. यंदा पासून आपण चंद्रपूरात माता महाकाली महोत्सवाला सुरवात केली आहे. यात चंद्रपूरकरांचा मोठा सहभागी आपल्याला लाभला आहे. पूढच्या वर्षी आयोजित होणार असलेल्या महाकाली महोत्सवात श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास बाल संस्कार केंद्रानेही सहभाग घ्यावा असे आवाहण यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

प्रत्येक यशस्वी मानसाच्या मागे गुरुचे मार्गदर्शन असते. हिंदु धर्मात गुरुचे स्थान सर्वोत्तम मानल्या गेले आहे. दत्त हे हि हिंदु धर्मातील गुरु होते. श्री दत्त हे योगसिद्धी प्राप्त करून देणारे देवता असुन संत एकनाथ महाराज व संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या अभंगातून दत्ताच्या त्रिमुखी असण्याचा उल्लेख केलेला आहे. आज दत्त जयंती निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमुळे सकारात्मक उर्जा निर्माण झाली असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos