महत्वाच्या बातम्या

 राज्यात ४ जिल्ह्यांना ऑरेंज तर १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात उत्तर व पश्चिम भागात अवकाळी पावसाचा आज तीव्र इशारा देण्यात आला असून विदर्भातील ४ जिल्ह्यांना ऑरेंज तर उर्वरित १७ जिल्ह्यांना पाऊस व गारपीटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

भारातीय हवामान विभागाने एकीकडे उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवल्यानंतर दुसरीकडे अवकाळी पाऊस व गारपीटीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

कोकण वगळता आज बहुतांश राज्यात पावसाचा अंदाज असून राज्याच्या उत्तर पश्चिम भागात जोरदार पावसासह गारपीटीची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून गारपीटीची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहणार असून वादळी पावसाची शक्यता आहे.

  Print


News - Rajy
Related Photos