महत्वाच्या बातम्या

 कोरची येथील ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन शोभेची वस्तू


- मागील तीन महिन्यापासून एकही सोनोग्राफी नाही. 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : तालुका हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त तालुका असून या तालुक्यातील गरोदर मातांना व गरजु रुग्णांना सोनोग्राफीचा लाभ मिळावा याकरिता प्रशासनातर्फे कोट्यवधी रुपये खर्च करून सोनोग्राफी सेंटर सुरू करण्यात आले, परंतु सदर मशीन मागील कित्येक महिन्यापासून फक्त रुग्णालयाची शोभा वाढवीत असल्याचे दिसून येत आहे.

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाले असून सुद्धा कोरची तालुक्यातील आरोग्याच्या सोयी सुविधेकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील बहुतेक रुग्ण मुख्यतः गरोदर मातांना दर गुरुवारी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे सोनोग्राफी करिता बोलविले जाते व रुग्ण सुद्धा दर गुरुवारला लांब रस्त्याचे अंतर कापून रुग्णालयात येतात, परंतु नेहमी त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण रुग्णालय कोरची येथे शेवटची सोनोग्राफी १६, १७ व १८ सप्टेंबरला रुग्णालयात झालेल्या शिबिरात झाले होते. परंतु दर गुरुवारला होणारी सोनोग्राफी ही मागील सात महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून बंद अवस्थेत असून असे महागडे उपकरण फक्त रुग्णालयाच्या शोभा वाढविण्याकरिता आहेत का? असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गरोदर मातांना सोयी सुविधा मिळावी व त्यांची प्रसुतीही सुखरूप व्हावी, याकरिता प्रशासनातर्फे विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जात असून त्याकरिता प्रशासनाचा कोट्यवधी रुपया सुद्धा खर्च होत आहे. परंतु नेहमी भोंगळ कारभारासाठी चर्चेत राहणाऱ्या ग्रामीण रुग्णालय यांना या योजनेचे काही घेणे देणे नसल्याचे दिसून येत आहे.

रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागते 

दर गुरुवारला लांब पल्याचे अंतर कापून येणाऱ्या गरोदर मातांना सोनोग्राफीचे लाभ मिळत नसल्या कारणाने त्यांना आरमोरी, ब्रह्मपुरी सारख्या ठिकाणी जाऊन सोनोग्राफी करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. तर मग असे महागडे उपकरण फक्त कागदापूर्तीच मर्यादित आहेत का? असा प्रश्न सुद्धा रुग्णांना निर्माण होत आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos