महत्वाच्या बातम्या

 महाराजस्व अभियानात ६ हजार दाखल्यांचा वितरण


- अडपल्ली येथे शासकीय योजनांची जत्रा 

- जि.प. माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : तालुक्यातील अडपल्ली चक येथे मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियान अंतर्गत शासकीय योजनांची जत्रा, महाराजास्व अभियान घेण्यात आले. यावेळी या शिबिरातून नागरिकांना तब्बल ६ हजार ३२७ दाखले वितरण करण्यात आले.

अडपल्ली चक येथे घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियानाचे उद्घाटन जि.प. माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम उपस्थित होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी तहसीलदार सर्वेश मेश्राम, जि.प. चे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, सरपंच रेखा कन्नाके, उपसरपंच महेंद्र बाबा आत्राम, नायब तहसीलदार करिष्मा चौधरी, नायब तहसीलदार राजेंद्र तलांडे, गटविकास अधिकारी एल बी जुवारे, कृषी अधिकारी (पंचायत) युवराज लाकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यातील गोमनी, देवदा येथे महाराजस्व अभियान संपन्न झाल्यावर ३ मे रोजी अडपल्ली चक येथे तिसरे महाराजस्व अभियान घेण्यात आले. या शिबिरात कालीनगर, विजयनगर, लक्ष्मीपूर, गांधीनगर, अडपल्ली (माल), अडपल्ली (चक) येथील नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला. 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन विकास साधा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी तहसीलदार सर्वेश मेश्राम तर सूत्रसंचालन तलाठी रितेश चिंदमवार यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos