महत्वाच्या बातम्या

 मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी : २ दिवस राहणार पाणीपुरवठा बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : 
मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत येत्या मंगळवारी आणि बुधवार म्हणजेच २९ आणि ३० नोव्हेंबर दरम्यान २४ तास पाणीपुरवठा बंद असणार आहे.
त्यामुळे जपूण पाणी वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतला आहे. यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मुंबईत पवई जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. या पवईच्या पाईपलाइनच्या दुरुस्तीची कामे बीएमसी करणार आहे. यामुळे पाणीकपात करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे १२ विभागांतील पाणीपुरवठ्या परिणाम होणार आहे. अंधेरी व्यतिरिक्त वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव आणि मध्य मुंबईतील दादर, माहीम आणि माटुंगा या भागांसह इतर भागातही पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
पवई उच्चस्तरीय जलाशयातील गळती दुरुस्तीचं काम केले जाणार आहे. तसंच वेरावल्ली जलाशयाचा आणखी एक इनलेट पुन्हा जोडला जाईल. या कामाला २९ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी८ वाजून ३०मिनिटांनी हे काम संपणार आहे. त्यामुळे काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी सोडण्यात येईल असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 





  Print






News - Rajy




Related Photos