पोलीस आणि नागरिकांनी श्रमदान करून बंद झालेला हलवेर - कोठी मार्ग केला सुरळीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : 
तालुक्यात आलेल्या पुरामुळे अनेक रस्त्यांची दैनावस्था झाली. रस्ते वाहून गेल्यामुळे अजूनही रस्त्यावरून आवागमन करणे बंद आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र रस्त्यांच्या डागडुजीसाठी आता पोलीस जवान आणि गावकरीच पुढे सरसावले आहेत. पावसामुळे वाहून जाऊन बंद पडलेला हलवेर  -  कोठी मार्ग श्रमदान करून सुरळीत केला आहे. 
उपविभागीय पोलीस अधिकारी  तानाजी बरडे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केंद्र कोठी मधील कर्मचारी व अधिकारी, सीआरपीएफ चे अधिकारी व कर्मचारी व  कोठी व कोठी टोला येथील ग्रामस्थांनी  मिळून रस्ता दुरुस्त केला आहे.  मागील पंधरा दिवसात  झालेल्या मुसळधार पावसामुळे  हलवेर  -  कोठी  मार्गावर असलेल्या   एकूण ४ पुला जवळील  भाग वाहून गेला.  यामुळे या मार्गावर  खड्डे पडलेले होते . या खड्ड्यामुळे रोडवरील वाहतुक मागील ८ दिवसांपासून बंद होती. सदरबाबत कोठीतील नागरिकांना बस बंद झाल्यामुळे खूप च त्रास सहन करावा लागला व त्याबाबत पोलीस मदत केंद्रात तक्रार  केली होती. त्यामुळे काल २३ ऑगस्ट रोजी  कोठी, कोठी टोला  गावकऱ्यांच्या श्रमदानातून तसेच  पोलिस मदत केंद्र, कोठी व सीआरपीएफ यांनी मिळून सदर रस्त्यावरील खड्डे बुजवुन वाहतुक सुरळीत केली.  यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  कामगिरीवर लोकांनी नाराजी व्यक्त  केली . रस्ता दुरुस्तीमुळे बस सेवा परत चालू झाली आहे. याबाबत पोलीस विभागाचे आभार मानले. या कामासाठी पोलीस मदत केंद्र कोठी चे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक रघुनाथ शिंदे  , पोलीस उपनिरिक्षक दयानंद वणवे  , CRPF चे असिस्टंट कमांडंट अशोक कुमार रिअल  यांनी  गावातील नागरिकांना  मार्गदर्शन करून रस्ता दुरुस्त करून  वाहतूक चालू करण्यासाठी  मोलाचे सहकार्य केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-24


Related Photos