पौवनी-गौरी ते राजुरा रस्ता जड वाहतुकीस बंद
- पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेश यांचे आदेश
- तीन महिने पर्यायी रस्त्याने वाहतुक करण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : पौवनी-गौरी ते राजुरा या रस्त्याचे काम सुरू सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघात होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सदर रस्ता 28 नोव्हेंबर 2022 ते 27 फेब्रुवारी 2023 या तीन महिण्यांसाठी जड वाहतुकीस बंद करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी निर्गमित केले आहे. पर्यायी मार्ग म्हणून राजुराकडून पडोलीकडे येणारी जड वाहतुक ही राजुरा-रामपुर-सास्ती-पौवनी-हडस्ती-देवाडा-दाताळा-पडोली या मार्गाचा वापर करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.
News - Chandrapur