जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते सुधगुडम येथे टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी तालुक्यातील उमानूर ग्रा.प. अतंर्गत येणाऱ्या सुध्दागुड्म येथे जि.एस.के. क्लब सुध्दागुड्म यांच्या कडून भव्य टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा पारितोषिक माजी पं.स. सभापती भास्कर तलांडे, शामराव गावडे व तिसरा पारितोषिक विष्णु गेडाम असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
आज सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अजय नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य, सुरेखा आलाम माजी पंचायत समिती सभापती अहेरी, तारा आसाम माजी सरपंच, कविता कुमरी ग्रा.पं. सदस्य, प्रशांत गोडशेलवार नगरसेवक अहेरी, पोचम संपत काका प्रतिष्ठित नागरिक, तिरुपती अल्लूरी उपसरपंच, शामराव गावडे, लक्ष्मिस्वांमी अठ्ठेला प्र.ना., विष्णु गेडाम प्र.ना , शंकर गावडे, संजय पोरतेट माजी सरपंच, मल्लेश कोंडा, श्रीनिवास मडावी माजी सरपंच, आनंदराव कोंडागुर्ले, वसंत इस्टाम, बापू बेडकी, चंद्रय्या येलकुची, परशुराम नैनी, आलाम पाटिल मर्रीगुडम, झाडे, सडवली बेडकी, नारायण गांधरला, राजना सिंगणबयोनी, संध्या गावडे, जयराम आत्राम, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेक होते.
कार्यक्रमाच्या संचालन व आभार प्रदर्शन चिरंजीव गांधार्ला यांनी केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण वेलादी, उपाध्यक्ष अरुण सलपाला, सचिव प्रभाकर सलपाला, महेश येलकुचि, दशरथ आसाम व गावातील पुरुष, महिला व खेळाडू उपस्थित होते.
News - Gadchiroli