महत्वाच्या बातम्या

 एकता दौडमुळे तरुणांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होईल : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- राष्ट्रीय एकता दौडचा शुभारंभ
विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : देशातील नागरिकांमध्ये असलेली विविधतेची भावना एकतेमध्ये जपन्यासाठी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडमुळे तरुणांच्या मनामध्ये एकात्मतेची भावना निर्माण होईल, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा ३१ ऑक्टोंबर हा जन्म दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने एकता दौडचे आयोजन करण्यात आले. या दौडचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
यावेळी आमदार पंकज भोयर, जिल्हा पोलिस अधिक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक यशवंत सोळके, जिल्हा क्रिडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, क्रिडा अधिकारी अनील निमगडे, प्रा. मोहन गुजरकर आदी उपस्थित होते. एकता दौडमध्ये जिल्ह्यातील खेळ संघटना, पोलिस दल, एन.सी.सी. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
एकता दौडच्या शुभारंभ प्रसंगी डॉ. पंकज भोयर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. देशाला मेहनतीने, कष्टाने स्वातंत्र्य लाभले आहे. हे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी आजच्या तरुणांमध्ये एकतेची व बंधुत्वाची भावना या एकता दौडच्या माध्यमातून रुजेल, असे आमदार भोयर यांनी सांगितले.
एकता दौडचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करुन दौड महात्मा गांधी चौक, विश्रामगृह मार्गाने आरती चौक, शिवाजी चौक मार्गे झाशी राणी चौक अशी मार्गक्रमण करुन जिल्हा क्रिडा संकुल येथे एकता दौडचा समारोप करण्यात आला.





  Print






News - Wardha




Related Photos