भारतीय किसान संघाचा सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा


- विविध मागण्यांचे दिले निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अंकीसा (सिरोंचा)
: सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघ सिरोंचा च्या वतीने प्रांतीय महामंत्री रमेश मंडाने यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष रमेश उप्पलवार, तालुकाध्यक्ष श्रीहरी अरीगेला यांच्या मार्गदर्शनात सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
शेतकऱ्यांना २४ तास विजपुरवठा देण्यात यावा, संपूर्ण थकीत विज बिल माफ करण्यात यावे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत देण्यात यावी,  शेती यंत्रे ५० टक्के अनुदानावर पुरवठा करणे, सिरोंचा तालुक्यात दुग्ध संकलन केंद्र सुरू करण्यात यावे, १००  टक्के अनुदानावर दुधाळू जनावरांचे वाटप करावे, ७० टक्के अनुदानावर ठिबक सिंचन सुविधा देण्यात यावी, मेडीगट्टा धरणातील महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे ४० टक्के पाणी वाटप करण्यासाठी कालव्याची कामे सुरू करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
मोर्चात शिवशंकर अरीगेला, मेचिनेनी मोहनराव, गणपूरपू कोंडय्या सावकार, रमेश चिंता, इदी रमेश, तोरकरी समय्या, पुलगम चेंद्रम, तोटा रामन्ना, कोठारी धर्मय्या, लगारी राजाराम तसेच आसरअल्ली, अंकीसा, पेंटीपाका, बालमुत्यापल्ली, गुमलकोंडा, सोमनूर आदी गावातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-13


Related Photos