महत्वाच्या बातम्या

 वरोरा पोलीस स्टेशनची सूत्रे महिलांच्या हाती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वरोरा : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन मधील वरोरा पोलीस स्टेशनची निवड करीत वरोरा पोलीस स्टेशनची सर्व सूत्रे आज महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आली. वरोरा पोलीस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या हस्ते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर महिला पोलीस कर्मचारी सुजाता रामटेके, पल्लवी बावणे, नीता दुबे, अश्विनी, जया नन्नावरे, रुक्माई बुठे, निशा अलोने, वैशाली वराडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वरोरा पोलीस स्टेशन मध्ये नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक अमोल काचोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकिरण मडावी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महिला दिनाचे औचित साधून पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर यांच्याकडे वरोरा पोलीस स्टेशनचा प्रभाव देण्यात आला. इतर जबाबदारी महिला पोलीस कर्मचाऱ्यावर देण्यात आली. या महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आज वरोरा पोलीस स्टेशनचा कार्यभार दिवसभर सुरळीतपणे चालविला कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कीटे यांनी केले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos