सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौऱ्यास श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंचा नकार


वृत्तसंस्था / कोलंबो :  सुरक्षेच्या कारणास्तव  श्रीलंकेच्या दहा क्रिकेटपटूंनी पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे पाकिस्तानातील क्रिकेट पुनरागमन मोहिमेला धक्का बसला आहे. 
२००९ साली लाहोर येथे श्रीलंकन खेळाडूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तेथील क्रीडाविश्व ठप्प झाले आहे. आता श्रीलंकन खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा पाय खोलात गेला आहे. पाकिस्तान व श्रीलंका यांच्यामध्ये २७ सप्टेंबरपासून द्विपक्षीय मालिका खेळविली जाणार होती. यामध्ये तीन वन डे व तीन ट्वेण्टी- २० सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र लसिथ मलिंगा, दिमुथ करूणारत्ने या स्टार खेळाडूंसह थिसार परेरा, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुशल परेरा, धनंजया डिसिल्व्हा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल व दिनेश चंडीमल या खेळाडूंनी दौऱ्यावर बहिष्कार टाकल्यामुळे आता हा दौरा अडचणीत सापडला आहे.  Print


News - World | Posted : 2019-09-10


Related Photos