महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांचे खाते बोनस रक्कम जमा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : ०९ नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार, आधारभुत किमंत खरेदी योजना अंतर्गत खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये बिगर आदिवासी प्रवर्गातील क्षेत्रात धान खरेदी करण्या करिता पणन महासंघाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणुन नेमणुक करण्यात आलेली आहे.

त्यानुषंगाने २६ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णया नुसार किमान आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत, खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये, केंद्र शासनाने मंजुर केलेल्या हमी भावा व्यतिरिक्त, योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रती हेक्टरी रु. २० हजार याप्रमाणे (दोन हेक्टरच्या मर्यादेत) प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.

त्यानुसार पणन हंगाम २०२३-२४ अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी वर्ग करण्याच्या अनुषंगाने रक्कम रु. ३०० कोटी ५१ लाख १८ हजार ३६० जिल्हा कार्यालयास प्राप्त झालेली असून ८ एप्रिल २०२४ अखेर १ लाख ४५ हजार ८४८ शेतकऱ्यांचे खात्यावर ऑनलाईन पध्दतीने रू. २९९ कोटी २५ लाख ३९ हजार ४४० रू. बोनस रक्कम ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या खाती वर्ग करण्यात आलेला आहे. असे, आवाहन एस. बी. चंद्रे सहा. जिल्हा पणन अधिकारी, भंडारा यांनी कळवले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos